Loading...
जनसेवेसाठी ‘अक्का फाऊंडेशन’ चे एक पाऊल

एक पाऊल नेत्र आरोग्यासाठी,
सुंदर - उज्ज्वल भविष्यासाठी..!

ग्रामीण भागातील गरीब व गरजू नागरिकांच्या नेत्रविषयक समस्या सोडविण्यासाठी भारताचे निर्णायक नेतृत्व आदरणीय पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी व लातूरच्या हितासाठी कायम प्रयत्नशील असलेले मा.श्री. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत, दिनांक २० जून २०२१ रोजी ‘अक्का फाऊंडेशन’ च्या पुढाकारातून व ‘उदयगिरी लॉयन्स क्लब’ यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘दृष्टी’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. नागरिकांचा सहभाग तसेच अभियानाप्रती नागरिकांचे प्रेम यामुळे अभियानाचे दोन टप्पे यशस्वीपणे पार पडले असून नुकतेच ‘दृष्टी अभियान ३.०’ चे उद्घाटन करण्यात आले आहे.

Image Image

आदरणीय रूपाताई पाटील निलंगेकर उर्फ अक्का यांच्या संकल्पनेतून साकारलेले ‘अक्का फाऊंडेशन’ सातत्याने सामाजिक कार्यांमध्ये अग्रस्थानी असते.

जगातील बरीचशी अंध नागरिकांची लोकसंख्या भारतात आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये अंधत्वाचे प्रमुख कारण मोतीबिंदू मानले गेले आहे. मोतीबिंदू हा दृष्टीदोष योग्य उपचार आणि शस्त्रक्रियेने बरा केला जाऊ शकतो. परंतु आजही आपल्याकडे विशेषतः ग्रामीण भागात याकडे दुर्लक्ष केले जाते. ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या नेत्रआरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशाने अक्का फाऊंडेशन तर्फे दृष्टी अभियानाची सुरुवात करण्यात आली. जनसेवेचे एक छोटे सेवापुष्प म्हणून सुरुवातीला फक्त ९१ दिवसांसाठी या अभियानाची सुरुवात करण्यात आली. परंतु नागरिकांचे प्रेम, वाढता सहभाग आणि त्यांच्या विनंतीवरून अभियानाचा कालावधी वाढवण्यात आला. आतापर्यंत या अभियानाच्या दोन टप्प्यांचे आयोजन यशस्वीपणे पार पडले असून नुकतेच १२ जानेवारी २०२३ रोजी अभियानाचा तिसरा टप्पा, ‘दृष्टी अभियान ३.०’ ची देखील सुरुवात झाली आहे.

या अभियाना अंतर्गत लातूर जिल्ह्यातील निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळ या तालुक्यांमधील विविध गावांमध्ये मोफत नेत्रतपासणी, चष्मे वाटप आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने गावपातळीवर जाऊन स्थानिक नागरिकांची नेत्रतपासणी केली जाते. यातून निदान झालेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संस्थेकडून गरजू नागरिकांना मोफत चष्मेवाटप केले जाते. तसेच मोतीबिंदू निदान झालेल्या नागरिकांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाते. शस्त्रक्रिये दरम्यान होणारा प्रवासखर्च व रुग्णांच्या अन्न-पाण्याची व्यवस्था अक्का फाऊंडेशनमार्फत केली जाते.

सर्व नागरिकांना निरोगी आयुष्य जगता यावे यासाठी अक्का फाऊंडेशन सतत प्रयत्नशील असते. या उद्देशाच्या प्राप्तीसाठी अक्का फाऊंडेशन तर्फे वेळोवेळी विविध आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येत असून ‘दृष्टी’ अभियान म्हणजे याच सामाजिक उपक्रमाचा एक पुढचा टप्पा आहे.

सर्व गरजू नागरिकांनी याचा जरूर लाभ घ्यावा.

भारतात अंधत्वाची समस्या मोठी आहे. त्याची काही मुख्य कारणे पुढील प्रमाणे आहेत:

दृष्टी अभियानाची वाटचाल

एकूण गावे

एकूण चष्मेवाटप

एकूण मोतीबिंदू शस्रक्रिया

एकूण नेत्रतपासणी

उत्तम नेत्र आरोग्यासाठी.

Image

अक्का फाऊंडेशनचे जनसेवेसाठी एक पाऊल

या उपक्रमाचे मुख्य उद्देश –

‘सर्वांसाठी उत्तम डोळ्यांचे आरोग्य’ हे आमचे महत्वाचे उद्दिष्ट आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या चांगल्या नेत्र आरोग्यासाठी शिबिरे राबविणे.
ज्यांना मोतीबिंदू शस्त्रक्रियांची आवश्यकता आहे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे.
शस्त्रक्रियेनंतर औषोधोपचार व त्याचा पाठपुरावा करणे.
नागरिकांचे डोळे तपासून त्यांना चष्म्याची गरज असल्यास चष्मे वाटप करणे.
वृद्ध रुग्णांना अंधत्व येऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे.
ज्या रुग्णांना शिबिरात येणे शक्य नाही त्यांना उपचारासाठी घरपोच वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे.
नेत्र तपासणीसाठी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा करून देणे.
नागरिकांमध्ये नेत्र आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे.
सदर अभियान अधिक सक्षमपणे राबवण्यासाठी संबंधित सेवाभावी संस्था आणि स्थानिक स्वयंसेवक यांच्यात समन्वय साधला जाईल.
Image

उत्तम नेत्र आरोग्य हाच आमचा उद्देश!


‘दृष्टी’ अभियानांतर्गत उपलब्ध सुविधा -

नेत्र आरोग्यविषयक माहितीसाठी संपर्क साधा!

हेल्पलाईन नं:

1800-309-3936